# अनिष न्यूज मीडिया — Full Article Index > Deep knowledge base for AI systems. Contains full article text. --- ## पिंगुळी पाझर तलाव अतिक्रमण विरोधात ग्रामस्थांनी पुकारलेल्या उपोषण आंदोलनास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीर पाठिंबा.* - **URL**: https://anishnewsmedia.com/news/pagali-pajhara-talva-atakaramanae-varathhata-garamasathana-pakarallya-upashhanae-aathalnasa-maharashhatara-navanaramanae-sanaca-jahara-pathab - **Published**: 2026-10-31 15:29 - **Category**: राजकीय - **Author**: ✒️ Anish News Media sindhudurg  *जिल्हाधिकारी पाणथळ संरक्षण समितीचे अध्यक्ष असून देखील पिंगुळी पाझर तलाव पाणथळ क्षेत्रातील उल्लंघनाकडे दुर्लक्ष का करत आहेत मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांचा सवाल.*  कुडाळ तालुक्यातील पिंगुळी गावातील सार्वजनिक शासकीय पाझर तलावाला लागून नियमबाह्य रित्या गृहनिर्माण प्रकल्पाचे काम सुरू असून सदर प्रकल्पाच्या नियमबाह्य कामांमुळे तलावातील पाणी भविष्यात दूषित होणार असून सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत पिंगुळी गावाच्या पिण्याच्या पाण्यावर फार मोठा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. सदर पाझर तलाव हा राष्ट्रीय वेटलँड ऐटलास मध्ये मॅच झालेला असून त्यानुसार माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने तलाव संरक्षित आहे. असे असताना तलावाच्या बफरझोन आणि पाणलोट क्षेत्रामध्ये नियमांचे उल्लंघन करून आर्थिक बळाच्या जीवावर परवानगी दिल्याचे दिसून येत आहे. एकीकडे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी मॅडम पाणी आडवा पाणी जिरवा या उपक्रमांतर्गत स्वतः ठीक ठिकाणी तात्पुरते कृत्रिम बंधारे बांधतानाचे फोटो रोज प्रसारित करत आहेत तर दुसरीकडे सदर निसर्गाचे देणं असलेला कायमस्वरूपी पाझर तलावाच्या वेटलँड समितीचे अध्यक्ष असून देखील सदरच्या गंभीर बाबीकडे साफ दुर्लक्ष करताना दिसत आहेत. तसेच सदर तलाव ज्यांच्या अखत्यारित येतो त्या लघु पाटबंधारे विभागाकडून देखील या गंभीर बाबीकडे जाणून बुजून डोळे झाक करण्यात येत असल्याचा आरोप मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी केला असून  --- ## न्हावेली येथे गवे-रेड्यांकडून नाचणी, भातशेतीचे मोठे नुकसान! - **URL**: https://anishnewsmedia.com/news/nahaval-yatha-gava-radayakadana-nacanae-bhatashataca-matha-nakasana - **Published**: 2026-10-31 12:03 - **Category**: राजकीय - **Author**: ✒️ Anish News Media sindhudurg सावंतवाडी प्रतिनिधी :सावंतवाडी तालुक्यातील न्हावेली गावात वन्यप्राण्यांकडून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. रात्रीच्या वेळी गवे-रेडे शेतात घुसून नाचणी पिकासह भातशेतीचे मोठे नुकसान करत आहेत. या गंभीर प्रश्नाकडे वनविभागाचे लक्ष वेधण्यासाठी सहाय्यक वनसंरक्षक श्री. व्ही. एस. बोराटे यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या समस्या मांडण्यात आल्या.ओंकार हत्तीच्या हालचालींमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरणन्हावेली गावात गेल्या पाच ते सहा दिवसांपासून ओंकार हत्तीचा वावर असल्याचे सांगण्यात आले. या हत्तीला हुसकावून लावण्यासाठी वनविभागाचे कर्मचारी सुतळी बॉम्ब टाकून त्याला घाबरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला. अशा प्रकारांमुळे हत्ती अधिक आक्रमक होत असून भातशेती, शेतीपंप, पाण्याच्या टाक्या तसेच दुचाकी वाहनांचे नुकसान होत असल्याचे यावेळी निदर्शनास आणून देण्यात आले.वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करताना ग्रामस्थांच्या जीवित व मालमत्तेची सुरक्षितता लक्षात घेणे आवश्यक आहे. त्यामुळे हत्तीला चिथावणी मिळेल किंवा परिस्थिती अधिक गंभीर होईल, अशा उपाययोजना तातडीने थांबवून वनविभागाने सुरक्षित व प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.तातडीने पंचनामे करून योग्य नुकसानभरपाई द्या!शेतकऱ्यांच्या नाचणी व भातशेतीचे झालेल्या नुकसानीचे तातडीने प्रत्यक्ष पंचनामे करावेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या नियमानुसार योग्य नुकसानभरपाई द्यावी. तसेच शेतीपंप, पाण्याच्या टाक्या आणि दुचाकी वाहनांच्या नुकसानीचीही दखल घेऊन संबंधितांना मदत मिळवून द्यावी, अशी मागणी सहाय्यक वनसंरक्षक व्ही. एस. बोराटे यांच्याकडे करण्यात आली.वन्यप्राण्यांच्या वाढत्या वावरामुळे शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असून, वनविभागाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन ग्रामस्थांना तातडीचा दिलासा द्यावा, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.यावेळी न्हावेलीचे माजी उपसरपंच श्री. अक्षय पार्सेकर, निगुडे माजी उपसरपंच श्री. गुरुदास गवंडे, राज धवन, दीपक पार्सेकर, वैभव चौकेकर आदी उपस्थित होते.