सावंतवाडी | प्रतिनिधी
राजकारणात सत्ता महत्त्वाची असते, पण त्याहीपेक्षा महत्त्वाची असते ती शब्दाला दिलेली साथ आणि मैत्री जपण्याची वृत्ती! सत्ता-संघर्षाच्या राजकारणातही मित्रांच्या शब्दाला जागत, ग्रामस्थांच्या विश्वासाला सार्थ ठरवत आणि विकासाचा ध्यास घेत यशस्वी वाटचाल करणारे इन्सुली जिल्हा परिषद मतदारसंघाचे सदस्य श्री. नितीन भाई राऊळ यांचा आज ३६वा वाढदिवस. त्यांच्या राजकीय प्रवासातील संघर्ष, विजय आणि समाजसेवेची वाटचाल आजही अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.
महायुतीच्या प्राबल्याला अपक्ष म्हणून दिले आव्हान!
इन्सुली जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा होताच राजकीय वातावरण तापले होते. महायुतीच्या जागावाटपात इन्सुली मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेला. मात्र, सत्ता आणि संघर्षाच्या या राजकारणात नितीन राऊळ यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. बलाढ्य महायुतीच्या उमेदवारासमोर अपक्ष म्हणून उभे राहणे हे मोठे आव्हान होते.
इन्सुली, शेर्ले, निगुडे, रोणापाल, वाफोली, डेगवे आणि कास या गावांचा समावेश असलेल्या मतदारसंघात कास वगळता अन्य गावांमध्ये महायुतीचे प्राबल्य असल्याचे चित्र होते. अशा परिस्थितीत भारतीय जनता पार्टीनेही त्यांना पक्षातून निलंबित केले. मात्र, या सर्व राजकीय घडामोडींना न जुमानता नितीन राऊळ यांनी मित्रांच्या साथीने संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला.
मित्रांची साथ आणि ग्रामस्थांचा विश्वास ठरला विजयाचा आधार!
या संघर्षात अनेक मित्रांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली. कासमध्ये सरपंच प्रवीण पंडित यांनी खिंड लढवली, तर निगुडेमध्ये युवा उद्योजक सागर राणे, गुरुदास गवंडे आणि बाबू गावडे यांनी प्रचाराची धुरा सांभाळली. वाफोलीमध्ये विठ्ठल कळंगुटकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी, तर रोणापालमध्ये सुदीन गावडे, नंदू नेमण आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नितीन राऊळ यांच्या विजयासाठी अथक प्रयत्न केले.
युवा वर्गाला सोबत घेत प्रत्येक गावात पोहोचणे, ग्रामस्थांशी संवाद साधणे आणि विश्वासाचे नाते निर्माण करणे, या माध्यमातून त्यांनी निवडणुकीत आपली वेगळी छाप पाडली. अखेर मित्रांची साथ आणि ग्रामस्थांच्या विश्वासाच्या जोरावर त्यांनी सुमारे एक हजार मतांच्या मताधिक्याने विजय संपादन केला.
या विजयातून त्यांनी केवळ निवडणूक जिंकली नाही, तर राजकारणात शब्दाला दिलेली साथ आणि मैत्रीचे नाते किती महत्त्वाचे असते, हेही दाखवून दिले. महायुतीच्या प्राबल्याला अपक्ष म्हणून आव्हान देत त्यांनी ‘हम भी किसीसे कम नही’ हे सिद्ध केले.
विजयानंतरही समाजसेवेचा ध्यास कायम!
जिल्हा परिषद निवडणुकीतील विजयाने नितीन राऊळ यांची राजकीय वाटचाल अधिक भक्कम झाली. त्यांची सिंधुदुर्ग जिल्हा परिषद विकास आघाडीच्या गटनेतेपदी नियुक्ती झाली. त्यानंतर जिल्हा परिषद शिक्षण समितीच्या सदस्यपदीही त्यांची निवड झाली.
या पदांचा उपयोग त्यांनी केवळ राजकीय प्रतिष्ठेसाठी न करता मतदारसंघातील विकासकामांसाठी केला. शिक्षण, गावागावांतील मूलभूत सुविधा आणि नागरिकांच्या प्रश्नांवर त्यांनी जिल्हा परिषदेत सातत्याने आवाज उठवला. प्रत्येक गावातील ग्रामस्थांशी संपर्क ठेवत त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
समाजकार्यात वावरताना कोणत्याही एका समाजापुरते मर्यादित न राहता सर्व समाजातील नागरिकांशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण करणे, ही त्यांच्या कार्यपद्धतीची खासियत ठरली आहे. निवडणुकीत साथ देणाऱ्या मतदारांचे आभार मानतानाच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे.
३६व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव!
सत्ता-संघर्षाच्या राजकारणातही मित्रांची साथ न सोडणारे, ग्रामस्थांच्या विश्वासाला महत्त्व देणारे आणि समाजसेवेचा वसा पुढे घेऊन जाणारे इन्सुली जिल्हा परिषद सदस्य श्री. नितीन भाई राऊळ यांचा आज ३६वा वाढदिवस.
त्यांच्या वाढदिवसानिमित्त मित्रपरिवाराच्या वतीने त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि समाजसेवेच्या कार्यात उत्तरोत्तर यश लाभो, अशी मनःपूर्वक प्रार्थना करण्यात येत आहे.
शब्दाला दिलेली साथ, मैत्रीची ताकद आणि विकासाचा ध्यास — हाच नितीन राऊळ यांच्या यशस्वी वाटचालीचा खरा परिचय!