अनिष न्यूज मीडिया
newspaper ई-पेपर
search

सावंतवाडी रेल्वे स्थानकात तीन प्रवासी गाड्या आणि मालगाडी एकाचवेळी !*

✒️ Anish News Media sindhudurg

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

WhatsApp शेअर Facebook X (Twitter)
सावंतवाडी रेल्वे स्थानकात तीन प्रवासी गाड्या आणि मालगाडी एकाचवेळी !*
“

सावंतवाडी रेल्वे स्थानकात तीन प्रवासी गाड्या आणि मालगाडी एकाचवेळी !*


सावंतवाडी : सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकात आज दुपारी १२ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास एक मालगाडी आणि तीन प्रवासी गाड्या एकाचवेळी दिसून आल्याने रेल्वे स्थानकातील उपलब्ध सुविधांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. कोकण रेल्वेचे वेळापत्रक सध्या विस्कळीत होत असल्याच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त फलाट आणि लूपलाईनची आवश्यकता अधोरेखित झाली आहे.




सावंतवाडी रेल्वे स्थानकाच्या शेजारी अतिरिक्त फलाट आणि लूपलाईन उभारण्यासाठी मोकळी जागा उपलब्ध आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने या जागेचा योग्य वापर करून आवश्यक पायाभूत सुविधांची उभारणी तातडीने करावी, अशी मागणी रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी यांच्या वतीने करण्यात आली आहे.




कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत रेल्वे गाड्यांचे नियोजन अधिक प्रभावी करण्यासाठी अतिरिक्त फलाट आणि लूपलाईन महत्त्वपूर्ण ठरू शकतात. मात्र, सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे काम अद्याप पूर्ण झालेले नसल्याने या सुविधांच्या उपलब्धतेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.




*केवळ आश्वासनांऐवजी प्रत्यक्ष कामाला गती द्या !*




सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे काम लवकरात लवकर पूर्ण करून प्रवाशांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. तसेच स्थानक परिसरातील उपलब्ध जागेचा नियोजनबद्ध वापर करून अतिरिक्त फलाट आणि लूपलाईनच्या कामाला गती द्यावी, अशी मागणी प्रवासी संघटनेने केली आहे.




रेल्वे वाहतुकीचे योग्य नियोजन, गाड्यांची वेळेत ये-जा आणि प्रवाशांना दिलासा देण्यासाठी सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचा प्रश्न आता तरी गांभीर्याने सोडवावा, अशी अपेक्षा रेल्वे प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.

✒️ Anish News Media sindhudurg

✒️ Anish News Media sindhudurg

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

*पाडवासांजमधून मळगावात १० नोव्हेंबर रोजी रंगणार मराठी एकांकिकांचा त्रिवेणी संगम*  *अष्टविनायक कला क्रिडा मंडळाचा सांस्कृतिक उपक्रम*
सामाजिक

*पाडवासांजमधून मळगावात १० नोव्हेंबर रोजी रंगणार मराठी एकांकिकांचा त्रिवेणी संगम* *अष्टविनायक कला क्रिडा मंडळाचा सांस्कृतिक उपक्रम*

न्हावेलीचे माजी उपसरपंच अक्षय पार्सेकर यांच्याकडून नितीन राऊळ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!"*
सामाजिक

न्हावेलीचे माजी उपसरपंच अक्षय पार्सेकर यांच्याकडून नितीन राऊळ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!"*

सत्ता-संघर्षात शब्दाला जागणारा लोकनेता म्हणजे नितीन राऊळ
राजकीय

सत्ता-संघर्षात शब्दाला जागणारा लोकनेता म्हणजे नितीन राऊळ

पिंगुळी पाझर तलाव अतिक्रमण विरोधात ग्रामस्थांनी पुकारलेल्या उपोषण आंदोलनास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीर पाठिंबा.*
राजकीय

पिंगुळी पाझर तलाव अतिक्रमण विरोधात ग्रामस्थांनी पुकारलेल्या उपोषण आंदोलनास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीर पाठिंबा.*